मुख्यमंत्री सहायता निधीत ठणठणाट

मुख्यमंत्री सहायता निधीत ठणठणाट

मुंबई - मुख्यमंत्री सहायता निधीत एकही पैसा नसल्याने चार हजारांहून अधिक रुग्णांना उपचारासाठी देण्यात येणारी मदत रखडली होती. दरम्यान मुंबईतील उद्योजकांनी काही तासांत १० कोटींची मदत केल्याने आता सोमवारपासून पुन्हा मदतीचे वाटप सुरू होणार असल्याचे कळते.

राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत केली जाते. काही वर्षांत या सहायता निधीसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या वाढली; मात्र निधी मर्यादित असल्याने काही काळापासून रुग्णांना आर्थिक मदत मिळत नव्हती. त्याकरिता १०० कोटींचा निधी मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील उद्योजकांना आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत मुंबई स्टॉक एक्‍चेंजमध्ये शुक्रवारी (ता. २१) झालेल्या एका कार्यक्रमात १० कोटींची मदत मिळाली. यात तीन कोटींचे धनादेश असून, सात कोटी रुपये लवकरच मिळतील असे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हे धनादेश स्वीकारले. सहाय्यता निधीसाठी १०० कोटींची मदत मिळण्याची अपेक्षा होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com