मुख्यमंत्र्यांविरुद्ध कॉंग्रेसची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

पालघर - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणादरम्यान केलेल्या घोषणाबाजीतून आचारसंहितेचा भंग केला, अशी तक्रार कॉंग्रेसचे उमेदवार दामोदर शिंगडा यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. इतर राजकीय पक्षांना होर्डिंग्ज व झेंडे लावण्यास विरोध केला जात असताना, भाजपला मात्र निवडणूक विभागाने तशी मुभा दिल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.

याबाबत कॉंग्रेसतर्फे आज पालघर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला.

Web Title: chief minister oppose complaint by congress politics