मुंबई - आगामी अर्थसंकल्पात वकिलांसाठी विकासात्मक योजना राबवण्याची मागणी करत मंगळवारी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
मुंबईसह राज्यभरातून हजारोंच्या संख्येने विविध वकील संघटनांच्या प्रतिनिधींनी या आंदोलनात सहभाग घेतला. यानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सतीश देशमुख, विशेष समितीचे सदस्य श्मामसुंदर दांगट, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष विठ्ठल कोंडे-देशमुख, ऍड उदय वारुंजीकर यांच्यासह संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. "मी स्वतः वकील असल्यामुळे या मागण्यांचा पाठपुरावा करेन,' अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली, अशी माहिती सतीश देशमुख यांनी दिली.
|