esakal | मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वाहिली आदरांजली
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वाहिली आदरांजली

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन केले.

मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वाहिली आदरांजली

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचं संकट असल्यानं शिवतीर्थावर गर्दी न करण्याचं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन केले.

यावेळी शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केले.  यावेळी उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, सुपुत्र आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर हजर होते. उद्धव ठाकरे यांचे कुटुंब केवळ पाच ते दहा मिनिटं या ठिकाणी उपस्थित होते.  यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.

या आधी शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवतीर्थावर बाळासाहेबांना अभिवादन केले.

अधिक वाचा-  साकीनाक्यात लागलेली आग दोन तासानंतर आटोक्यात, लाखोंचं नुकसान

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचं संकट असल्यानं शिवतीर्थावर गर्दी न करण्याचं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोनाचे सावट असल्याने गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसंच कोरोनाव्हायसरचा संसर्ग सुरु असल्याने अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व शिवसैनिकांना मास्क वापरणं आणि सोशल डिन्स्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक आहे.

Chief Minister Uddhav Thackeray tribute Shiv Sena chief Balasaheb Thackeray with family

loading image
go to top