esakal | ओढून ताणून मुंबईतून काही नेण्याचा प्रयत्न केला तर...! मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

ओढून ताणून मुंबईतून काही नेण्याचा प्रयत्न केला तर...! मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील उद्योजक आणि चित्रपट सृष्टीतील मान्यवरांची ते आज भेट घेणार आहेत

ओढून ताणून मुंबईतून काही नेण्याचा प्रयत्न केला तर...! मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील उद्योजक आणि चित्रपट सृष्टीतील मान्यवरांची ते आज भेट घेणार आहेत. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योगींवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातून कोणीच काहीच ओढून नेऊ शकत नाही असं ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - दुसरी लाट थोपवण्यासाठी मुंबईत कोरोनाची नाकेबंदी सुरू; आरटी-पीसीआर चाचण्यांवर भर

मिशन एन्गेज या पुस्तिकेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. त्यावेळी त्यांनी योगी अदित्यनाथांचे नाव न घेता निशाणा साधला. ' आज काही लोकं मुंबईत आले आहेत, ते तुम्हाला म्हणतील तुम्ही या आमच्या सोबत उत्तरप्रदेशला! परंतु त्यांना माहित नाही आपल्यातलं मॅग्नेटिक खुप स्ट्रॉंग आहे. इथून कोणी तर जाणारच नाही परंतु असं नको व्हायला त्यांच्याकडचे इथे यायला'! असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र एक वेगळं राज्य आहे, वेगळी संस्कृती आहे. यासाठी महाराष्ट्र प्रगतीशील आहे. आम्हाला कोणी प्रगती करीत असेल तर आनंदच आहे. देशातील वातावरण हे आनंदी स्पर्धात्मक असावं असं आम्हाला वाटतं. परंतु ओढून ताणून जर महाराष्ट्रातून कोणी काही नेण्याचा प्रयत्न करीत असेल. तर ते आपण होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - कुठे महाराष्ट्राचं वैभव तर कुठे यूपीचं दारिद्र; योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात मनसेची पोस्टरबाजी

फिल्म इंडस्ट्री मुंबईच्या बाहेर जाऊ शकत नाही: अनिल देशमुख

मुंबईः  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. आदित्यनाथ यांचा हा दोन दिवसीय दौरा असणार आहे. यावेळी ते बॉलिवूडचे अभिनेते आणि निर्मात्यांशी चर्चा करणारेत. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी निर्माण करण्याची योजना असल्याचं त्यांनी म्हटलं आणि त्यावरुन राजकारण तापलं आहे. यावरुन आता विरोधकांकडून योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही यामुद्द्यावरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे.  फिल्म इंडस्ट्रीसाठी मुंबईसारख्या सुविधा कोणतंही राज्य देऊ शकणार नसल्याचं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं आहे. 

Chief Minister Uddhav Thackeray warns Yogi Adityanath 

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top