उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या सोबतचा 'तो' खास फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

पूजा विचारे
Wednesday, 22 July 2020

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात.

मुंबईः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांच्यासोबतचा एक खास फोटो ट्विटरवर शेअर करत त्यांचं अभिष्टचिंतन केलं आहे. 

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ईश्वर आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. 

देवेंद्र फडणवीस हे आज ५० वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनीही फडणवीसांना शुभेच्छा दिल्यात.

मुख्यमंत्र्यांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या परंपरेला साजेसे काम आपल्याकडून घडो, याच सदिच्छा,  असं पाटील यांनी आपल्या शुभेच्छा देणाऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही आज वाढदिवस आहे. कोरोनाच्या संकटामुळं सर्वच नेत्यांनी यंदा वाढदिवस साजरा करण्याचं टाळलं आहे. सोशल मीडियावरूनच कार्यकर्ते, चाहते आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या जात आहेत. तसं आवाहन अजित पवार आणि फडणवीसांनी आधीच केलं होतं. 

नीतेश राणेंकडून फडणवीसांना योद्धाची उपमा 

भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार कौतुक केलं आहे. त्यांनी फडणवीस यांना योद्ध्याची उपमा दिली आहे.

'आमचा योद्धा इतका फिरला की सत्ताधाऱ्यांची हवा निघाली,' असं ट्विट नीतेश राणे यांनी केलंय. 

Chief Minister Uddhav Thackeray wished Devendra Fadnavis on 50th birthday


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray wished Devendra Fadnavis on 50th birthday