आणीबाणीच्या काळातील बंदीजनांना सन्मानपत्र देणार : मुख्यमंत्री 

उमेश शेळके
मंगळवार, 25 जून 2019

मुंबई : आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना शासनातर्फे पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु आर्थिक सुस्थ‍ितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारले आहे. अशा स्वातंत्रसौनिकांना सन्मानपत्र देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

 सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ''आतापर्यंत ३२६७ जणांना मानधन मंजूर करण्यात आले आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यात राहणाऱ्यांना आणीबाणीच्या काळात बंदीवास भोगावा लागला आहे. ते आज विविध ठिकाणी आहेत. त्यांची शपथपत्रे घेण्यात येतात मात्र, संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेशिवाय ते मंजूर करण्यात येत नाही.''

यावेळी काही आमदारांनी अशी प्रकरणे मंजूर करण्यात जिल्हाधिकारी यांच्याकडून विलंब होतो. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर संबंधित कामकाज कालमर्यादेत पूर्ण व्हावीत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील असे  मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

भविष्यात हा निधी वाढविण्यासाठी विचार करण्यात येईल. त्याचबरोबर गोवा मुक्ती संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम संबंधित सर्व सैनिकांना मानधन प्रदान करण्यात येते. या सैनिकांना आणि आणीबाणीत बंदीवास भोगलेल्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल. यावेळी सदस्य पराग अळवणी, सुभाष पाटील, शशिकांत शिंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister will honor the faces of the imprisonment during the emergency