जेवणाऐवजी चिक्की द्या! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

नवी मुंबई - बालवाडी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारात चिक्कीऐवजी शिजवलेले अन्न देण्याच्या पालिका प्रशासनाच्या प्रस्तावाला शिवसेना व राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी जोरदार विरोध केला. शिजवलेल्या अन्नाऐवजी विद्यार्थ्यांना चिक्की द्या, म्हणजे जमेल तेव्हा ते खातील, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे महापौर जयवंत सुतार यांनी हा प्रस्ताव फेटाळला. 

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार अंतर्गत राजगिरी व शेंगदाणा चिक्की देण्यात येते; मात्र वारंवार तेच पदार्थ दिल्यामुळे विद्यार्थी खाण्यास कंटाळतात. त्यामुळे चिक्कीऐवजी शिजवलेले पौष्टिक पदार्थ देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने पटलावर सादर केला होता. माध्यमिक विभागाला सध्या माध्यान्ह पुरवणाऱ्या मुंबईतील अन्नमित्र फाऊंडेशनमार्फत शिजवलेले पदार्थ पुरवण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार 37 हजार 85 विद्यार्थ्यांना दोन वर्षे शिजवलेले पदार्थ पुरवण्यासाठी 31 कोटी 42 लाख 29 हजार 516 रुपये फाऊंडेशनला देण्यास मंजुरी मिळावी यासाठी प्रस्ताव महासभेत सादर केला होता; मात्र या प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी विरोध केला. विद्यार्थ्यांना चिक्की हवी तेव्हा खाता येऊ शकते; मात्र जेवण वेळेवरच खावे लागेल; अन्यथा ते खराब होईल. मग महापालिका जेवण पुरवण्यासाठी एवढी आग्रही का, असा प्रश्‍न त्यांनी विचारला. 

परिसरातील स्वच्छता 
महापालिकेच्या काही शाळा झोपडपट्टीत आहेत. त्या ठिकाणी आजूबाजूला अस्वच्छता असते. मग शिजवलेले अन्नपदार्थ अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना खायला कसे देणार? त्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्‍क्‍या बाजारात उपलब्ध आहेत. प्रशासनाने विद्यार्थ्यांना त्या द्याव्या, अशी मागणी माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी केली. शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला नगरसेवकांचा असलेला विरोध लक्षात घेऊन महापौरांनी तो फेटाळला; मात्र शिक्षण विभागाने काढलेल्या शुद्धीपत्रातील खर्चाला मंजुरी दिली. 

Web Title: Chikki instead of lunch