दोन महिन्यांचे मूल वारशासाठी दत्तक

दोन महिन्यांचे मूल वारशासाठी दत्तक

मुंबई - दोन महिन्यांचे बाळ हैदराबादमधील जोडप्याला बेकायदा विकल्याच्या आरोपाखाली वि. प. रोड पोलिसांनी मुलाच्या जन्म देणाऱ्या कथित आईसह चौघांना अटक केली आहे. संबंधित श्रीमंत कुटुंबाने दोन मुली असतानाही वारस हवा म्हणून मुलाला दत्तक घेतले आहे. २०१५च्या सुधारित नियमावलीनुसार सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ऑथरिटीच्या परवानगीशिवाय दत्तक घेता  येत नाही.

पुण्यात दुय्यम निबंधक कार्यालयात दत्तक विधान तयार करण्यात आले असून, त्याबाबत बालकल्याण समितीची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. बाळाला कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले असून, याप्रकरणी बाळाचे आई-वडील कोण आहेत? यासाठी लवकरच डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. सारिका जाधव (२३), महेंद्र प्रसाद (५२), हुमा दळवी (३२) व माही सिंग (२२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यातील माही सिंग बाळाची जन्मदाती असल्याचा दावा करत आहे. त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माही सिंगने ७ फेब्रुवारीला मुलाला पुण्यात दत्तक दिले असून, ते आपल्याला परत हवे असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याबाबतच्या कागदपत्रांची मागणी केली असता तिच्याकडे ती सापडली नाहीत. त्यानुसार पोलिसांनी जाधव, प्रसाद व दळवी यांना ताब्यात घेतले. त्या वेळी महिलेने पनवेलमध्ये राहणाऱ्या सुजाता नावाच्या महिलेच्या माध्यमातून दोन लाख ८० हजार रुपयांना बाळाला विकले असून, त्यातील दोन लाख १० हजार माहीला दिल्याचे पोलिसांना समजले. माहीने दत्तक विधान तयार केले; मात्र त्याबाबतची माहिती बालकल्याण समितीला देण्यात आलेली नाही. 

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तक घेणाऱ्या कुटुंबाने दत्तक विधानाच्या कागदपत्रांच्या प्रती पोलिसांना सादर केल्या आहेत.

सुधारित नियमावली कडक
‘सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ऑथरिटी’ केंद्रीय संस्थेकडे ऑनलाईन नोंदणी करावी लागते. त्यांच्यामार्फतच मुले दत्तक घेण्याची प्रक्रिया केली जाते. २०१५मध्ये दत्तक घेण्याच्या पद्धतीत सुधारित नियम करण्यात आले आहे. हे नियम काटेकोर असून, या प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय दत्तक देता अथवा घेता येत नाही, अशी माहिती नगर येथील स्नेहालय संस्थेचे समन्वयक अजय बावळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com