मूर्ती लहान; पण उलाढाल अचाट

कैलास रेडीज
शुक्रवार, 15 जून 2018

ऑर्गेनिक कपडे, विविध वस्तूंवर कार्टून्सचा प्रभाव

ऑर्गेनिक कपडे, विविध वस्तूंवर कार्टून्सचा प्रभाव
मुंबई - लहान मुलांच्या पोषाखांमध्ये कार्टून आणि व्हिडिओ गेम्समधील लोकप्रिय पात्रे, ऐतिहासिक व्यक्‍तिरेखा यांची छाप दिसते. स्पायडरमॅन, बॅटमॅन, मोटू-पतलू, छोटा भीम, मोगली या कॉमिक पात्रांवरील तयार कपड्यांची बाजारात चलती आहे. नुकताच "ऍव्हेंजर्न्स' हा ऍनिमेशनपट जगभरात रिलीज झाला. "ऍव्हेजर्न्स'च्या थिमवर अनेक कंपन्यांनी लहान मुलांच्या तयार कपड्यांची श्रेणी बाजारात आणली आहे.

नवजात बालकांसाठी ऑर्गेनिक कपडेदेखील बाजारात आले आहेत. सेंद्रिय कापसापासून तयार केलेल्या वस्त्राद्वारे लहान मुलांचे ऑर्गेनिक कपडे तयार केले आहेत. किड्‌स फॅशनमध्ये शालेय गणवेशाचाही मोठा वाटा आहे. किड्‌स वेअरच्या बाजारात मुलांचा हिस्सा 51 टक्के आणि मुलींचा 49 टक्के आहे. मुलांवर वेस्टर्न वेअरचा प्रभाव आहे. शिवाय हंगामानुसार कपड्यांची मोठी बाजारपेठ आहे.

मुलांच्या आवडीनिवडीला प्राधान्य
शैक्षणिक साहित्याचा विचार करताना दप्तरात (बॅग) अनेक बदल दिसत आहेत. पोषाखांप्रमाणेच बॅग, वॉटरबॉटल, पेन्सील, कंपास आणि इतर साहित्यावर कार्टूनचा सर्वाधिक प्रभाव आहे. शिवाय, सॉफ्ट मटेरियलमधील स्कूल बॅग्ज मुलांसाठी आकर्षण ठरत आहेत. प्री-प्रायमरीमधील मुलांसाठी सॉफ्ट मटेरियलपासून तयार केलेल्या विविध प्राण्यांच्या आकारातील बॅग्ज मुलांना भुरळ घालतात. त्यांच्या किमती 300 रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत आहेत. मुलांना दैनंदिन वापरातील साजेशा वस्तू आकर्षक आणि नावीन्यपूर्ण देण्याची काळजी बड्या कंपन्यादेखील घेतात. मिकी माऊस, स्पायडरमॅनच्या थीमवरील ट्रेंडी टूथब्रश, मुलांच्या टूथपेस्ट, शूज, कपडे, गॉगल्स, घड्याळ इत्यादी उत्पादने मुलांच्या आवडीनिवडीनुसार करण्याला कंपन्यांकडून प्राधान्य दिले जाते.

आकडे बोलतात
लहान मुलांची फॅशन बाजारपेठ : 80,000 कोटी
फॅशन ब्रॅंड : 50

Web Title: child cloth design transaction