बालकस्नेही न्यायालयांचे कामकाज आजपासून सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मुंबई - मुंबई सत्र न्यायालयात बालकस्नेही न्यायखोल्यांचे कामकाज बुधवारपासून (ता. 12) सुरू होईल, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्‍त्यांनी उच्च न्यायालयात आज दिली.

मुंबई - मुंबई सत्र न्यायालयात बालकस्नेही न्यायखोल्यांचे कामकाज बुधवारपासून (ता. 12) सुरू होईल, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्‍त्यांनी उच्च न्यायालयात आज दिली.

मुंबई सत्र न्यायालयात पीडितस्नेही आणि बालकस्नेही स्वरूपाच्या तीन न्यायखोल्यांची व्यवस्था केली जाईल. त्याचप्रमाणे एक प्रतीक्षा कक्षही उभारला जाणार आहे. या न्यायखोल्यांसाठी विशिष्ट पद्धतीच्या काचेचा वापर केला जाणार आहे. दिंडोशी सत्र न्यायालयातही बालकस्नेही न्यायखोल्या तयार करण्यासाठी आर्थिक तरतुदीबाबत पाठपुरावा सुरू आहे, असे महाधिवक्‍त्यांनी मंगळवारी सांगितले.

मुंबई सत्र न्यायालयात बांधल्या जाणाऱ्या या तीन न्यायखोल्यांसाठी 23 लाख रुपये मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई उच्च न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल करून घेतली आहे. राज्यात बालकस्नेही न्यायालयांची व्यवस्था करण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.

नागपूरमध्येही सुविधा
मुंबईच्या धर्तीवर राज्यभरात बालकस्नेही न्यायखोल्या सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. नागपूरमध्ये असे न्यायालय सुरू करण्याबाबत तेथील सत्र न्यायालयातील प्रधान न्यायाधीशांसोबत चर्चा करू, असे महाधिवक्‍त्यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. नरेश पाटील व न्या. एम. एस. कर्णिक यांना सांगितले.

Web Title: Child friendly Court Work Start High Court