नवी मुंबईत चाईल्ड हेल्पलाईन सुरू!

नवी मुंबईत चाईल्ड हेल्पलाईन सुरू!
नवी मुंबईत चाईल्ड हेल्पलाईन सुरू!

नवी मुंबई : नवी मुंबईत संकटात सापडलेल्या मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन (१०९८) सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनचे उद्‌घाटन नुकतेच ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते खारघर येथील युवा सेंटरमध्ये करण्यात आले. सर्व यंत्रणांनी एकत्रित येऊन समन्वय साधल्यास लहान मुलांच्या संदर्भातील गुन्हे रोखण्यासाठी मदत होणार असल्याचे मत या वेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

नवी मुंबईत बाल भिक्षेकरी, बाल मजुरी, बाल लैंगिक शोषण, शारीरिक व लैंगिक अत्याचाराने पीडित मुले, शाळकरी तसेच वस्ती पातळीवरील मुलांसंदर्भात येणाऱ्या तक्रारी, त्याचप्रमाणे विधी संघर्षग्रस्त मुले, दुर्लक्षित मुले, रस्त्यावरील मुले, घर सोडलेली मुले अशा मुलांची प्रकरणे वाढत चालली आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने नवी मुंबईत चाईल्ड हेल्पलाईन चालवण्यासाठी युवा संस्थेची निवड केली. त्यानुसार या हेल्पलाईनचे काम सोमवारपासून (ता. ९) युवा संस्थेच्या खारघर येथील सेंटरमधून सुरू झाले. या हेल्पलाईनची सुरुवात शनिवारी (ता. ७) युवा सेंटरमध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.

अशी असेल चाईल्ड हेल्पलाईन?
चाईल्ड हेल्पलाईन-१०९८ ही राष्ट्रीय पातळीवरील आपत्कालीन हेल्पलाईन फोन सेवा असून, जी मुले संकटात सापडतात, ज्या मुलांचे शोषण होते, अथवा ज्या मुलांना मदत व संरक्षणाची गरज आहे, अशा मुलांना या हेल्पलाईनच्या माध्यमातून मदत
केली जाते.

नवी मुंबई हा वेगाने विकसित होणारा पट्टा असल्यामुळे येथील शहरीकरणात तसेच लोकसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे येथील लहान मुलांच्या संदर्भातील गुह्यांतदेखील वाढ होत आहे. त्यामुळे चाईल्ड लाईन हेल्पलाईनची या भागात आवश्‍यकता होती.
- महेंद्र गायकवाड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com