दारूच्या नशेत मुलाचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मुंबई - चार वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी आरोपीला चार तासांतच पोलिसांनी गजाआड केले. राजेंद्र कश्‍यप असे त्याचे नाव आहे. दारूच्या नशेत राजेंद्रने मुलाला पळवून नेले होते. राजेंद्र सध्या पोलिस कोठडीत आहे. अपहरण झालेल्या मुलाला आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

नागपाडा परिसरात ही घटना घडली. त्याची आई एका केटररकडे जेवण बनवण्याचे काम करते. बुधवारी (ता. 14) जोगेश्‍वरी पश्‍चिम येथे एक लग्न होते. तिथे रात्री ती जेवण बनवत होती. खेळता खेळता मुलगा हॉलच्या बाहेर गेला. शोधाशोध सुरू झाली. अंबोली पोलिसांनी याविषयी मुख्य नियंत्रण कक्षाला कळवले. आझाद मैदान पोलिस ठाण्याचे बीट मार्शल नेमचंद राठोड आणि संतोष साहेबराव पहाटे मेट्रो येथील गोल मशिदीपाशी गस्त घालत होते. तिथे राजेंद्र एका मुलाला घेऊन जाताना दिसला. संशय आल्याने पोलिसांनी त्याला अडवले. तो दारूच्या नशेत होता. याविषयी अंबोली पोलिसांना कळवण्यात आले. अंबोली पोलिसांनी मुलाची छायाचित्रे बीट मार्शलना व्हॉट्‌सऍपवर पाठवले. ओळख पटताच राजेंद्रला ताब्यात घेऊन अंबोली पोलिसांकडे सोपवण्यात आले.

राजेंद्र हा उत्तर प्रदेशातील हॉटेलात काम करतो. काही महिन्यांपूर्वीच तो मुंबईत आला होता. त्याने पोलिसांना सांगितले की लहान मुलगा जोगेश्‍वरी परिसरात रडताना दिसला. दया आल्याने दारूच्या नशेत मी त्याला सोबत घेतले. अवघ्या चार तासांत पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलाची सुटका केली.

Web Title: child kidnapping