भिवंडीत बालविवाह रोखला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

भिवंडी -  शहरातील अंजुरफाटा भागातील साठेनगर येथे शुक्रवारी (ता. १७) होणारा अल्पवयीन मुलीचा विवाह नारपोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोखण्यात आला. पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह तिच्या आई व भावांना ताब्यात घेतल्याची चाहूल लागताच नवरदेवाने लग्न मंडपात येण्याचे टाळून पलायन केले. पोलिसांनी याप्रकरणी नोंद घेत चौकशी सुरू केली आहे.

बुलडाणा तहसीलदार यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार त्यांनी बुलडाणा पोलिस व भिवंडी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मालोजी शिंदे यांनी अंजुरफाटा साठेनगरमध्ये जाऊन अल्पवयीन वधूसह तिची आई नीलाबाई ऊर्फ संगीता रमेश पवार व भाऊ दिलीप रमेश पवार या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. ही माहिती मिळताच तालुक्‍यातील कालवार गाव येथील नवरा मुलगा अक्षय सुरेश मेढेकर हा लग्नमंडपात न येताच त्याने परस्पर पळ काढला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: child marriage stop in bhiwandi