नाल्यात पडलेले बालक अद्याप बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

मालाडमध्ये बुधवारी रात्री नाल्यात पडलेला दीड वर्षाचा मुलगा २४ तास उलटल्यानंतरही सापडलेला नाही. दिव्यांश धानसी असे या मुलाचे नाव असून, त्याचा शोध तब्बल दहा किलोमीटर पर्यंत घेण्यात आला आहे. मात्र तो सापडत नसल्याने संध्याकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकामार्फत शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

मुंबई - मालाडमध्ये बुधवारी रात्री नाल्यात पडलेला दीड वर्षाचा मुलगा २४ तास उलटल्यानंतरही सापडलेला नाही. दिव्यांश धानसी असे या मुलाचे नाव असून, त्याचा शोध तब्बल दहा किलोमीटर पर्यंत घेण्यात आला आहे. मात्र तो सापडत नसल्याने संध्याकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकामार्फत शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

मालाड पूर्व येथील गोरेगाव मुलुंड लिंक रोड जवळील आंबेडकर नगरच्या रस्त्याच्या बाजूच्या नाल्यात हा मुलगा पडला. बुधवारी रात्री ९.३० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. मुलगा घरी दिसत नसल्याने आईने शोधाशोध सुरू केली. बराच वेळ मुलगा न सापडल्याने त्या परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता मुलगा नाल्यात पडला असल्याचे दिसले. त्यानंतर अग्निशमन दलाला कळविण्यात आले. 

पाण्याच्या प्रवाहामुळे हा मुलगा मुख्य नाल्यात वाहून गेला असल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अग्निशामन दल, पालिका कर्मचारी आणि पोलिसांनी त्या परिसरातील दहा किलोमीटरपर्यंतच्या नाल्याची तपासणी केली. गुरुवारी संध्याकाळी एनडीआरएफच्या पथकाला पाचरण करण्यात आले. मात्र विविध विभागांच्या १५० हून अधिक जणांनी शोधूनही या मुलाचा २४ तासांनंतरही शोध लागलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Not Receive in Dranageline