पेंग्विनला पाहण्यासाठी चिमुकल्यांची झुंबड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मुंबई - स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या देशातील पहिल्या पेंग्विनला पाहण्यासाठी राणीच्या बागेत शुक्रवारी लहान मुलांची झुंबड उडाली. आज साडेतीन हजारांहून अधिक मुलांनी गर्दी केली होती.

मुंबई - स्वातंत्र्यदिनी जन्मलेल्या देशातील पहिल्या पेंग्विनला पाहण्यासाठी राणीच्या बागेत शुक्रवारी लहान मुलांची झुंबड उडाली. आज साडेतीन हजारांहून अधिक मुलांनी गर्दी केली होती.

पेंग्विनच्या जन्माविषयी लहान-थोरांना सर्वांनाच उत्सुकता होती. 15 ऑगस्टला पेंग्विनचा जन्म होणार असल्याचे माहीत असल्याने या दिवशी आठ हजार पर्यटकांनी बागेत हजेरी लावली होती. या दिवशी राणीच्या बागेच्या प्रशासनाला 3 लाख 25 हजारांचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती संचालक संजय त्रिपाठी यांनी दिली. लहान मुलांसाठी पेंग्विन दर्शन मोफत आहे. त्यामुळे आज केवळ एक लाख 25 हजारांचेच उत्पन्न मिळाले.
नवजात पेंग्विनचे जन्मावेळी 75 ग्रॅम वजन होते. दोन दिवसांत त्यात वाढ झाली आहे. या पिलाचे वजन आज 83 ग्रॅम नोंदले गेले.

Web Title: Children mob for Penguin See