गाड्यांवरील चायनीज मेलेल्या कोंबड्यांचे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मुुंबई - मुंबईतील चायनीज गाड्यांवर मिळणारे पदार्थ हे मेलेल्या कोंबड्यांचे असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) छाप्यांमधून निष्पन्न झाले आहे. शिवडीतील एका झोपडीवर नुकताच छापा घालून एफडीएने 40 ते 50 किलो चिकनचे मांस जप्त केले.

या झोपडीतून विकले जाणारे सगळे पदार्थ हे मेलेल्या कोंबड्यांपासून बनविले जात होते. खरेतर हा नागरिकांच्या आरोग्याशी, जिवाशी केलेला खेळ आहे. या प्रकरणात एका व्यक्तीविरोधात कारवाईही करण्यात आली आहे. मुंबईत रोज हजारो कोंबड्या बाहेरून विक्रीस आणल्या जातात. या दरम्यान रोगट कोंबड्या मरतात. त्यांचेच मांस या झोपडीत विकले जात होते. हे मांस 25 ते 30 रुपये किलोने विकले जाते. अशा गाड्यांवरील चिकन न खाण्याचे आवाहन एफडीएने केले आहे.

Web Title: Chinese dangerous Hen Chicken crime