चिनी हेल्मेट हद्दपार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई  - दंगल नियंत्रण पथकामध्ये असणारी चिनी हेल्मेटची मक्तेदारी लवकरच मोडीत निघणार आहे. आयआयटी मुंबईच्या इंडस्ट्रियल डिझाइन सेंटरने भारतीय बनावटीच्या हेल्मेटचे डिझाइन व एक नमुना हेल्मेटचे मॉडेल तयार केले आहे. तणावाची परिस्थिती, तसेच मोटारसायकल यासाठी या हेल्मेटचा दुहेरी उपयोग होईल.

दंगल नियंत्रण पथकामार्फत सध्याच्या वापरातील हेल्मेट ही बहुतांशी चिनी बनावटीची आहेत. तसेच या हेल्मेटचा वापर हा फक्त आपत्कालीन स्थितीत जमावाकडून होणारी दगडफेक हाताळण्यापुरताच आहे. मोटारसायकलवर वापरण्यास ते सक्षम नाही; परंतु असे दुहेरी हेल्मेट आयआयटीच्या आयडीसीने तयार केले आहे. 

सध्या पोलिसांमार्फत वापरण्यात येणाऱ्या हेल्मेटच्या थर्माकोलची जाडी ३० ग्रॅम्स प्रतिस्क्वेअर मीटर इतकी आहे; पण थर्माकोलची इतकी जाडी डोक्‍याच्या संरक्षणासाठी पुरेशी नाही. त्यामुळेच जास्त थर्माकोलच्या जाडीच्या हेल्मेटची डिझाइन आणि प्रोटोटाइप (नमुना) मॉडेल आयडीसीमार्फत तयार करण्यात आले आहे.

छोटी मुले, महिलांसाठी हेल्मेट
अनेकदा कुटुंब एकत्रितरीत्या दुचाकीवर प्रवास करत असते. त्यामुळे मुलांचे संरक्षणही तितकेच गरजेचे आहे. म्हणूनच दुचाकी चालवणाऱ्या महिलांच्या सोयी व गरजांनुसारही आयडीसी हेल्मेट डिझाइन करत आहे. हेल्मेटमुळे महिलांचे केस विस्कटू न देणे, कानातले दागिने व केसांची शेंडी, ऑफिसला जाण्यातील अडसर होणार नाही, अशा सगळ्या गोष्टींचा विचार महिलांसाठी हेल्मेट तयार करताना केला असल्याची माहिती आयडीसीचे प्राध्यापक बी. के. चक्रवर्ती यांनी दिली.

Web Title: Chinese Helmet Exile