चिन्मय शेजवळ 'मुंबई विद्यापीठ श्री'चा मानकरी

चिन्मय शेजवळ 'मुंबई विद्यापीठ श्री'चा मानकरी

उल्हासनगर : नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेत चिन्मय शेजवळ हा विद्यार्थी सुवर्ण पदकासह 'मुंबई विद्यापीठ श्री'चा विजेता ठरला आहे. उल्हासनगरात कानसई रोड भागात राहणाऱ्या वयोवृद्ध आजी जनाबाई शेजवळ यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलेल्या चिन्मय आला होता. 

चिन्मय शेजवळ हा ठाणे जिल्हापरिषदचे कक्ष अधिकारी मनोहर शेजवळ यांचा मुलगा आहे. डोंबिवली मध्ये राहणारा चिन्मय हा ठाकुर्ली मधील के.एम.पटेल कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. बॉडी बिल्डिंग आवडत असल्याने चिन्मयने व्यायामशाळेत धडे घेतले. संजय चव्हाण, अतुल आंब्रे, उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिन्मय घडू लागल्यावर मुंबई विद्यापीठ श्री शरीर सौष्ठव स्पर्धा जाहीर झाली. आर.ए.डी.ए.व्ही.महाविद्यालयात पार पडलेल्या या स्पर्धेत चिन्मयने भाग घेतला आणि सर्व वजनी गटांवर मात करून सुवर्ण पदकासह मुंबई विद्यापीठ श्री विजेतेपद पटकावले. टीवायबीकॉम पर्यंत शिक्षण घेऊन करियर बॉडिबिल्डिंग घडवण्याचा व राज्य तसेच देशपातळीवरील स्पर्धेत भाग घेण्याचा मनोदय चिन्मय शेजवळ याने आजीचा आशिर्वाद प्रसंगी उल्हासनगरात व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com