राष्ट्रवादीला मोठा धक्का; महिला प्रदेशाध्यक्षा करणार भाजपमध्ये प्रवेश

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 जुलै 2019

राष्ट्रवादीची महाराष्ट्रात मोठी पडझड चालू असून आता राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई : राष्ट्रवादीची महाराष्ट्रात मोठी पडझड चालू असून आता राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

आज (ता.26) चित्रा वाघ यांनी काँग्रेसचे आमदार कालीदास कोळमकर यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळत आहे. 

चित्रा वाघ यांच्यासह काँग्रेसचे आमदार कालिदास कोलमकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड हेसुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हे तिघेही 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस झटका दिला असतानाच, उल्हासनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी यांच्यासह चित्रा वाघ आणि वैभव पिचड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chitra Wagh may enters in BJP on 30 july