esakal | म्हणे ठाणे स्मार्ट सिटी होणार; इथे तर अंतिमसंस्कारासाठीही होतेय वणवण...
sakal

बोलून बातमी शोधा

म्हणे ठाणे स्मार्ट सिटी होणार; इथे तर अंतिमसंस्कारासाठीही होतेय वणवण...
  • स्मार्ट ठाण्यात ख्रिस्ती समाजाची दफनभूमीसाठी वणवण
  • लॉकडाऊन काळात डोंगरात पायपीट करून होताहेत अंत्यसंस्कार

म्हणे ठाणे स्मार्ट सिटी होणार; इथे तर अंतिमसंस्कारासाठीही होतेय वणवण...

sakal_logo
By
दीपक शेलार : सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे स्मार्ट सिटी बनत असताना शहरातील तब्बल चार लाख ख्रिस्ती (अल्पसंख्य) समाजासाठी दफनभूमीची वानवा असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात, ठाणे जनरल ख्रिश्चन सेमेटरी कमिटीने दफनभूमी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक वर्षे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मात्र, वागळे इस्टेट प्रभागातील डोंगरातील दफनभूमीचा प्रस्ताव सरकारदरबारी लालफितीत अडकल्याने ख्रिस्ती समाजाचे हाल सुरूच आहेत. त्यामुळे दफनभूमीचा प्रश्न निकाली काढावा, यासाठी कमिटीने आता थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहेत.

वाचा - शेवटच्या वर्षाच्या परीक्षांबाबत UGC ने नवीन नियमावली दिल्यानंतर मंत्री उदय सामंत म्हणतात, झालेले सर्व निर्णय...

ठाणे शहरात ख्रिस्ती समाज अल्पसंख्य असला तरी, शहराच्या विकासात या समाजाचेही फार मोठे योगदान आहे. मात्र, ठाणे महापालिका तसेच राज्य सरकारकडून या समाजासाठी अद्याप दफनभूमीसाठी जागा दिलेली नाही. गेल्या 25 वर्षांपासून कोपरी-पाचपाखडी विधानसभा क्षेत्रातील वागळे इस्टेट प्रभाग क्र. 15 येथील सर्व्हे क्र. 520 मध्ये डोंगरात असलेल्या मोकळ्या रानात आजवर 500 पेक्षा अधिक मृतदेह दफन करण्यात आले आहेत. सदर जमीन डोंगराळ भागात असल्याने 200 पेक्षा अधिक पायऱ्या चढुन मृतदेह उचलून चढावे लागते. या दफनभूमीमध्ये वीज, पाणी यासारख्या कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. शिवाय, संरक्षक भिंत नसल्याने वन्यश्वापदांचा मूक्त संचार आणि गर्दुल्ले, मद्यपी यांचाही त्रास असतो. 

सध्या कोरोना महामारीत तर, ख्रिस्ती समाजाचे हाल होत आहेत. मृतदेह उचलून डोंगर चढताना सोशल डिस्टन्सिंग पाळता येत नसल्याने अनेक परवानग्या व वाहनांची तजवीज करून मृतदेह घेऊन मुलुंड पूर्वेला जावे लागते. आधीच मुंबईचा भार असल्याने आता तेथेही मृतदेह स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे ख्रिस्ती समाजाची कुचंबणा सुरू आहे.

वाचा - MD आणि MS च्या परीक्षांंबाबत लवकरच निर्णय घेणार; राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात माहिती.. 

निवडणुका आल्या की ख्रिस्ती समाजाला आश्वासने देऊन चुचकारण्याचे काम केले जाते. पालिका आयुक्तांसह अल्पसंख्याक आयोगाकडे तसेच, जिल्हाधिकारी आणि मंत्रालयातून कोकण आयुक्तांकडे याबाबतची फाईल पोचली. पण, अद्याप हक्काची दफनभूमी मिळालीच नाही.
- सनोज यादव, ख्रिस्ती पास्टर

 

प्रशासनाला आरक्षणाचा विसर!
  1993 साली शहराच्या विकास आराखड्यात स्मशानभूमी, दफनभूमी व कब्रस्तानासाठी आरक्षणच न ठेवल्याने ठाणे शहरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोट्यवधी खर्च करून ठाणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना शहरात स्मशानभूमीचे हे विदारक सत्य समोर आले असून ठाणे महापालिकने स्मशानभूमीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

loading image
go to top