
आज सकाळपासून ठाण्याच्या वेशीवर अभुतपूर्व ट्रॅफिक जाम झालं. टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
मुंबईः सलग तीन दिवस सुट्टी आल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या उद्धभवल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. आज नाताळ तसंच शनिवार आणि रविवार लागून सुट्टी आली आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिक पर्यटनासाठी खासगी वाहनं घेऊन बाहेर पडलेत. आज सकाळपासून ठाण्याच्या वेशीवर अभुतपूर्व ट्रॅफिक जाम झालं. टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यात दररोजच्या चाकरमान्यांचीही कोंडी झाली.
मुंबईतल्या वाशी, ऐरोली, मुलुंड, दहिसर टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळाल्या. ठाणे जिल्ह्यातील कल्याण शिळफाटा तर भिवंडी मार्गावर नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास २ किलोमीटर पर्यत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कल्याण ते शिळफाटा या ३० मिनिटांच्या अंतरासाठी दोन तास लागत आहेत.
हेही वाचा- बनावट स्कॉच विक्रेत्यांवर अबकारी विभागाची कारवाई, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त
कल्याण-शिळफाटा मार्गावर शिळफाटा ते काटई नाका, घोडबंदर येथे कासारवडवली-गायमुख, ठाणे -बेलापूर मार्गावरील कळवा ते दिघा आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर कोपरी ते मुलुंड येथील नवघर पोलिस ठाण्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. तर भिवंडीच्या पडघा टोलनाक्यावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
कल्याण- शिळफाटा मार्गावर रस्ता रुंदीकरणाची कामे सुरु आहेत. घोडबंदरच्या मार्गावर सुरु असलेली मेट्रोची कामे, तसंच ठाणे- बेलापूर मार्गावरील कळवा खाडी पूल बांधकाम तर पूर्व द्रुतगती महामार्गावरील अरुंद कोपरी पूल यामुळे ठाणे शहरातील या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या दररोज उद्भवत असते.
Christmas vacation thane traffic toll plaza kalyan shilphata