गृहखरेदीसाठी सिडकोचे ऍप लॉंच

गृहखरेदीसाठी सिडकोचे ऍप लॉंच

नवी मुंबई - सिडको महामंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 15 हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेसाठी सिडको ऑनलाइन-2018 हे मोबाईल ऍप लॉंच करण्यात आले. या ऍपच्या मदतीने ग्राहकांना थेट मोबाईलवरून गृहखरेदीचा अर्ज भरता येणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते सोमवारी हे ऍप लॉंच झाले.

मोबाईल ऍपवरील व संगणकातील अर्ज भरण्याची यंत्रणा एकसारखीच आहे. प्रोबेटी सॉफ्टवेअर यांनी हे ऍप तयार केले आहे. गृहनिर्माण योजनेतील अर्ज भरण्यासाठी आवश्‍यक असलेला स्वतःचा फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड अथवा धनादेश माहिती स्कॅन करून मोबाईल ऍपवर अपलोड करणे सोपे होणार आहे; तसेच वेब्स ऍप्लिकेशनच्या तुलनेत मोबाईल ऍपवर ग्राहकांना नोंदणीचा ओटीपी क्रमांक तत्काळ प्राप्त होईल. इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन ताटकळत उभे राहण्यापेक्षा मोबाईल ऍपवर सुरक्षित रक्कम अदा करता येणार आहे. सिडकोच्या 14 हजार 838 सदनिकांसाठी आतापर्यंत दोन लाख 30 हजार 573 लोकांनी सिडकोच्या संकेतस्थळाला भेट दिली आहे. यापैकी एक लाख 53 हजार 624 जणांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या अर्जदारांपैकी एक लाख 29 हजार 533 अर्जदारांनी घरांसाठी अर्ज केला आहे. यातून 79 हजार 664 ग्राहकांनी अनामत रक्कम जमा केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com