फेब्रुवारीत सिडकोची सोडत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

नवी मुंबई - सिडकोने गेल्या वर्षी १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर सुमारे १५ हजार घरांसाठी सोडत काढली होती. त्यामधील शिल्लक १ हजार १०० घरांची सोडत फेब्रुवारीत काढण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे.

सिडकोने अल्प उत्पन्न व आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली, तळोजा, खारघर या ठिकाणी घरे उभारली आहेत. त्यासाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये १४ हजार ८३८ घरांची सोडत जाहीर करण्यात आली होती. त्या वेळी दीड लाखापेक्षा अधिक ग्राहकांनी पसंती दर्शवली होती. 

अल्प उत्पन्न गटातील काही भागांत बांधण्यात आलेली घरे लहान असल्याने आणि अधिक किमतीमुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे अल्प उत्पन्न गटात एक हजार २७; तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात ७३ घरे शिल्लक आहेत. अशा १ हजार १०० घरांसाठी आता पुन्हा सोडत काढण्यात येणार आहे. त्यासाठी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत नोंदणीला सुरुवात झाली.

 ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख - ३१ जानेवारी रात्री १२ वाजेपर्यंत 
 अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख - १ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत 
 यशस्वी अर्जदारांची पहिली यादी प्रकाशनची तारीख - ६ फेब्रुवारी

Web Title: Cidco Draw in February