सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाणीटंचाई; विधिमंडळात तारांकित प्रश्‍न

prashant thakur
prashant thakurGoogle


पनवेल : सिडकोच्या (cidco) नियोजन शून्य कारभारामुळे व नव्याने विकसित होणाऱ्या गृह प्रकल्पाच्या (housing project) पार्श्वभूमीवर भविष्यात गंभीर पाणी टंचाईला (water scarcity) सामोरे जावे लागणार असल्याची भीती आमदार प्रशांत ठाकूर (Prashant thakur) व आमदार महेश बालदी (Mahesh Baldi) यांनी तारांकित प्रश्नाद्वारे (Star questions) विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (winter session) व्यक्त केली. या संदर्भात योग्य उपाययोजना करण्याची मागणीही या वेळी केली. (cidco irresponsibility of water supply turned into water scarcity star questions in winter sessions)

prashant thakur
'सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान' सरकार यंदातरी राबविणार का ?

सिडको विकसीत खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल येथील काही विभागांत नेहमीच अनियमित पाणी पुरवठा होत असून नागरिकांना दरवर्षी तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. नव्याने विकसित गृहप्रकल्पांना पाणी पुरवठ्याच्या वेळीस उपायायोजना न झाल्यास भविष्यात असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शासनाने चौकशी करून सिडको क्षेत्रातील गृहप्रकल्प, नवीन गृहप्रकल्पांना तसेच कामोठे येथील वसाहतींना पाणी पुरवठा होण्याबाबत कोणती उपाययोजना वा कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी दाखल केला होता.

गुळसुंदेतील पाणी समस्‍येमुळे आरोग्‍य धोक्‍यात
गुळसुंदे गावाला पाणीसमस्‍येने ग्रासले आहे. अशुद्ध व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण झाल्‍याचा उल्‍लेखही प्रशांत ठाकूर यांनी केला. गुळसुंदे ग्रामपंचायतीत लाडीवली, आकुलवाडी या गावांसह डोंगरीची वाडी, स्टेशनवाडी, फलाटवाडी, चिंचेचीवाडी या आदिवासी वाड्यांचा समावेश आहे. मात्र पाणी समस्‍येमुळे नागरिकांच्या आरोग्‍याच्या व्याधी बळावल्‍या आहेत.

prashant thakur
एसटी संपासाठी गोळा केलेले पैसे गेले कुठे?कर्मचाऱ्यांचा सवाल

गेल्या १० ते १२ वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या ५२ वर्षे जुन्या नादुरुस्त व बंद पडलेल्या चावणे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाताळगंगा नदीतील प्रदूषित पाणी कोणतीही जलशुद्धीकरण प्रक्रिया न करता आठवड्यातून एक ते दोन वेळा केवळ अर्धा तासासाठी गावाला पुरवले जात असल्‍याचे या वेळी नमूद केले.

गुळसुंदेतील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच शुध्द व नियमित पाणी पुरवठ्याबाबत योग्‍य नियोजन करण्यात यावे, अशी मागणी प्रशांत ठाकूर यांनी केली. यावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या उत्तरात, गुळसुंदेतील पाणी समस्‍येवर उपाययोजना सुरू असून दररोज टीसीएल प्रक्रिया करून जलशुद्धीकरण केंद्रातून गुळसुंदे गामपंचायतीतील गावे व वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्‍याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com