सिडकोच्या "भोजनभाऊं'चे संमेलन रद्द 

सिडकोच्या "भोजनभाऊं'चे संमेलन रद्द 

नवी मुंबई - सिडकोच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या शाही थाटावर होणाऱ्या उधळपट्टीवर "सकाळ'ने प्रकाश टाकल्यानंतर सिडकोच्या अध्यक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीचे दिलेले आदेश, चहूबाजूंनी होणाऱ्या टीकेच्या पार्श्‍वभूमीवर सिडकोच्या सांस्कृतिक आणि क्रीडा समितीने हे संमेलनच रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्यासाठी कारण दिले ते मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे! 

स्नेहसंमेलनावर होणाऱ्या अवाजवी खर्चावर "सकाळ'ने प्रकाश टाकल्यानंतर नागरिकांकडून कररूपाने मिळणाऱ्या पैशांचा अपव्यय करणाऱ्यांची पोलखोल होण्याची भीती संबंधितांना वाटत होती. त्यात सिडकोच्या अधिकाऱ्यांचा तसेच कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. या पार्श्‍वभूमीवर सिडको कार्यालयात बुधवारी एक बैठक झाली. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनरागे, सिडकोचे अधिकारी तसेच कामगार संघटनांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत प्रशासनाने "सकाळ'च्या बातमीची आकडेमोड करत फसवे स्पष्टीकरण देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र खर्चाच्या पावत्याच लेखा परीक्षणात सादर झाल्या नसल्याने संबंधितांची कोंडी झाली. एकही निविदा न काढता केवळ संचालक मंडळाच्या मंजुरीने झालेल्या उधळपट्टीमुळे व्यवस्थापकीय संचालकांपासून, सिडकोचे अधिकारी- कामगार संघटनांचे पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्व अधिकारी अडचणीत येत असल्याने कोणीही पुढे येऊन बोलण्यास तयार नव्हते. याबाबत सिडकोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही. 

कर्मचाऱ्यांच्या स्नेहसंमेलनावर उधळपट्टी करण्यासाठी प्रशासनाकडे मुबलक पैसा आहे. या पैशांतून नेक प्रश्‍न मार्गी लागले असते. किमान सिडकोच्या हद्दीतील गावे तरी हागणदारीमुक्त झाली असती. 
- गोपाळ पाटील, अध्यक्ष, उरण उत्कर्ष समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com