नेरूळमध्ये सिडकोची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

बेलापूर - नेरूळमधील सिडकोच्या भूखंडावर अतिक्रमण करून बांधलेल्या बेकायदा झोपड्या आणि नर्सरींवर सिडकोने मंगळवारी (ता. १६) कारवाई केली. ही कारवाई सुरू असताना फोटो काढणाऱ्या ‘सकाळ’च्या प्रतिनिधीला सिडकोच्या सुरक्षा बलातील कर्मचाऱ्याने दमदाटी करून फोटो डिलीट करण्यास सांगत वाद घातला.

नेरूळ जिमखान्यासमोर सीवूड्‌स रेल्वेस्थानकाशेजारच्या आणि ज्वेल ऑफ नवी मुंबईसमोरील बालाजी टेकडीवरील बेकायदा झोपड्यांवर सिडकोने कारवाई केली. त्यात शेकडो झोपड्या हटवल्या. सिडकोने यापूर्वीही येथे कारवाई केली होती; परंतु पुन्हा येथे बेकायदा झोपड्या झाल्या होत्या. नेरूळ जिमखान्यासमोर सिडकोच्या भूखंडावरील बेकायदा नर्सरीवर सिडकोने कारवाई केली. त्यात तेथील शेकडो शोभेची आणि फूलझाडे, कुंड्या, मडकी, तुळशी वृंदावने सिडकोने जप्त केली. ही कारवाई सुरू असताना तेथे फोटो काढत असलेल्या ‘सकाळ’च्या प्रतिनिधीला सिडकोच्या सुरक्षा रक्षकाने दमदाटी करून फोटो डिलीट करण्यास सांगितले. या घटनेची माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना दिल्यानंतर अशी घटना घडली असेल तर ते चुकीचे आहे. याबाबत घटनास्थळावरील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: CIDCO's action in Nerul

टॅग्स