कळंबोलीतील विकासकामांना सिडकोची ‘हरकत’

कळंबोलीतील विकासकामांना सिडकोची ‘हरकत’

नवीन पनवेल : महापालिका स्थापन होऊन जवळपास तीन वर्षे उलटून गेली; मात्र कळंबोलीतील वसाहतींमधील नागरी सुविधांबाबतच्या समस्या अद्याप मार्गी लागल्या नाहीत. याबाबत सिडको महामंडळाकडून पालिकेस ना हरकत दाखला न दिल्याने वसाहतीमधील नागरी समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे सिडकोने पालिकेला त्वरित ना हरकत दाखला द्यावा, अशी मागणी कळंबोली वसाहतीमधील सतीश पाटील यांच्यासह सर्व नगरसेवकांनी केली आहे.

सिडकोने ३५ वर्षांपूर्वी विकसित केलेल्या कळंबोली वसाहतीमधील नागरी समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पालिका स्थापन होऊन जवळपास तीन वर्षे झाली आहेत. कळंबोली वसाहत क्षेत्रातील जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्या जीर्ण झाल्या असून त्या बदलण्याची आवश्‍यकता आहे. जीर्ण झालेल्या मलनिःस्सारण वाहिन्यांमुळे कळंबोलीकरांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तसेच वसाहतीमधील रहदारीच्या रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे.

समस्या दूर करण्याबाबत अनेकदा ग्रामस्थांनी आवाज उठवला. पालिकेला या ठिकाणी काम करण्याची इच्छा असूनही सिडकोचे ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने विकासकामे करणे पालिकेला शक्‍य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पनवेल महानगरपालिका व सिडको यांच्यातील हस्तांतरण होण्यापूर्वी कळंबोली वसाहतीमधील नागरी समस्या सोडवणे गरजेचे आहे. वसाहतीमधील नागरी समस्यांचे निराकरण झाल्याशिवाय हस्तांतरण प्रक्रियेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध राहील.
- सतीश पाटील, नगरसेवक तथा जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com