आलोक नाथ यांची "सिन्टा'तून उचलबांगडी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

मुंबई - दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केलेल्या आरोपांची घेत दि सिने ऍण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशनने अभिनेते आलोक नाथ यांची संघटनेच्या सदस्यपदावरून उचलबांगडी करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. संघटनेने ट्विटद्वारे ही माहिती दिली. 

आलोकनाथ यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप नंदा यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती. ती दाखल झाल्यानंतर महिनाभरानंतर सिन्टाने हे पाऊल उचलले. 

आलोक नाथ यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे ; मात्र ते चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करू शकतात. दिग्दर्शकांनी स्वत:च्या जबाबदारी त्यांना आपल्या प्रोजेक्‍टमध्ये घ्यावे. भविष्यात आलोकनाथ यांच्याकडून अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी सिन्टावर राहणार नाही, असे या संघटनेने स्पष्ट केले आहे. 

Web Title: The Cine and Television Artists Association has decided to lift the ball from the membership of Alok Nath's organization