घाटकोपरमध्ये मुलीच्या मृत्यूप्रकरणी आंदोलन

घाटकोपरमध्ये मुलीच्या मृत्यूप्रकरणी आंदोलन
घाटकोपरमध्ये मुलीच्या मृत्यूप्रकरणी आंदोलन

मुंबई ः घाटकोपरच्या रमाबाई नगरातील जेजे रुग्णालयात वैद्यकीय अभ्यासक्रमात शिकणाऱ्या भार्गवी दुपारे या मुलीचा पाच महिन्यांपूर्वी घाटकोपरच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्याला तेथील जबाबदार डॉक्टवर अजूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ नातेवाईक आणि भीम आर्मी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले.

पाच महिन्यांपूर्वी वडिलांनी भार्गवीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यावर पोलिसांनी त्या डॉक्टरवर योग्य कारवाईचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर अंत्यसंस्कार झाले होते. बुधवारी भीम आर्मी संघटनेचे कार्यकर्त्यांनी भार्गवीच्या नातेवाईक कुटुंबांसहित रमाबाई कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून निषेध आंदोलन केले. 

रमाबाई कॉलनीतील आंबेडकर पुतळा येथे काही महिला व पुरुष यांनी एकत्र येत रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात निषेध व्यक्त केला. पोलिसांनी तपास संस्थांच्या अहवालानंतर योग्य कारवाईचे आश्वासन त्यांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com