कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन समिती बजेटकडे नागरिकांचे लक्ष्य

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन समिती बजेटकडे नागरिकांचे लक्ष्य

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाचे 2018 - 19 चे सुधारीत आणि 2019- 2020 अंदाज पत्रक व्यवस्थापक मारुती खोडके शुक्रवार ता 4 जानेवारी रोजी परिवहन समिती समोर मांडणार असून, यावर्षी तरी केडीएमटीला आणि कल्याण डोंबिवलीकराना केडीएमटी प्रशासनाकडून अच्छे दिन येतील का ? केडीएमटीमधील डबघाई, मरगळ दूर होईल का ? याकडे कल्याण डोंबिवली करांचे लक्ष्य लागले आहे.

गेल्या वर्षी कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाचे तात्कालीन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी मागील वर्षी मंगळवार ता 2 जानेवारी 2017 रोजी सादर केले होते. त्यांनी त्यावेळी अंदाज पत्रकात रखडलेल्या कामाला महत्व देत सन 2017- 18चे सुधारीत अंदाजपत्रक जमा 85 कोटी 49 लाख 38 हजार रुपये, तर खर्च 82 कोटी 99 लाख 6 हजार रुपये,  शिल्लक 2 कोटी 50 लाख 6 हजार रुपये, तर सन 2018 - 2019 मूळ अंदाज जमा 104 कोटी 88 लाख 2 हजार रुपये, खर्च 102 कोटी 20 लाख 86 हजार रुपये, शिल्लक 2कोटी 67 लाख 16 हजार रुपयाचे अंदाज पत्रक सादर केले होते. अंदाजपत्रकामध्ये मागील अंदाज पत्रकाच्या कामाची रीघ ओडली होती. 

रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस देविदास टेकाळे त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला होता. त्यांनी केडीएमटी मधील कर्मचारी आणि अधिकारी वर्गावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरले आणि ढिसाळ नियोजनामुळे घरघर लागली. कर्मचारी वर्गाच्या दांड्या, बसेस खराब यामुळे बसेस रस्त्यावर उतरण्याऐवजी त्या डेपोत धूळ खात पडल्याचे चित्र होते यामुळे तात्कालीन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्यावर अविश्ववास आणला आणि राज्य शासनाने त्यांची बदली केली त्यांच्या जागी व्यवस्थापक पदी मारुती खोडके आले आहेत. ते शुक्रवार ता 4 जानेवारी रोजी नवीन वर्षांत अंदाज पत्रक सादर करणार असून कल्याण डोंबिवली कराना काय नवीन वर्षांत भेट देणार, केडीएमटीला आलेली मरगळ आणि डबघाई दूर करण्यासाठी काय प्लान सादर करतात याकडे लक्ष्य लागले आहे.

पालिकेकडे अनुदान किती मागणार किती देणार ? 
डेपो नूतनीकरण काम रखडलेला, बसेस धूळ खात, उपन्न घटले, कर्मचारी वर्गाच्या दांड्या, वाहतूक कोंडीने उपन्न घटले, याचा फायदा रिक्षा, खासगी बसेस आणि वाहनांनी घेतला असून प्रवासी दिवसेंदिवस केडीएमटी पासून लांब होत असून नवीन वर्षात बजेटमध्ये काय? याकडे लक्ष्य लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com