प्रशासनाच्या पावसाळ्यापूर्वीच्या कामांमुळे कल्याणकरांना नाहक त्रास

रविंद्र खरात 
गुरुवार, 13 जून 2019

कल्याण : कल्याण पूर्व मधील पावसाळ्यापूर्वी कामासाठी दरवर्षी निविदा काढून कामे केली जातात मात्र काही अधिकारी आणि ठेकेदार यांनी दुर्लक्षपणा करत असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत असून याबाबत पालिका आयुक्त यांची आज भेट घेतली असून त्यांनी कामे मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले असून त्याचा पाठपुरावा सुरू ठेवणार असून कामे रखडल्यास कल्याण पूर्व मधील भाजपा नगरसेवक प्रशासनाला महासभेत जाब विचारतील असा इशारा कल्याण पूर्व मधील आमदार गणपत गायकवाड यांनी दिला आहे.

कल्याण पूर्व मधील विविध समस्यां वर आज गुरूवार ता 13 जून रोजी आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पूर्व मधील भाजपा नगरसेवक मनोज राय, अभिमन्यू गायकवाड, विक्रम तरे, विशाल पावशे, नगरसेविका इंदिरा तरे, सुनीता खंडागळ, हेमलता पावशे, परिवहन समिती सदस्य संजय मोरे आदींनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची पालिका मुख्यालय मध्ये भेट घेतली. यावेळी आयुक्त दालनात पालिका आयुक्त आणि अधिकारी समवेत महत्वपूर्ण बैठक झाली. नाले आणि गटार साफ न झाल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात पाणी घुसले तर विठ्ठलवाडी तलाव दुरावस्था, आशेळे येथील रस्ता रखडला, शंभर फूट रस्तामध्ये येणारी इमारत मधील नागरिकांचे पुर्नवसन, नागरिकांना अनेक दिवसापासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आदी विषयावर साधक बाधक चर्चा झाली ़

बैठकीनंतर आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले की दरवर्षी नाले सफाई आणि गटार सफाई साठी निविदा काढतात मात्र दरवर्षी ही कामे व्यवस्थित न झाल्याने ती पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जातो मात्र ही कामे काही अधिकारी आणि ठेकेदारांच्या उदासीनतेमुळे होत नसल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला असून आज पालिका आयुक्त यांनी आश्वासन दिले, ही कामे न नगरसेवक सभागृहात निश्चित प्रशासनाला जाब विचारतील असा इशारा आमदार गणपत गायकवाड यांनी दिला .यामुळे आगामी काळात विविध समस्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे , दरम्यान पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आज आमदार गणपत गायकवाड आणि अन्य नगरसेवकानी भेट घेतली त्यांच्या तक्रारी नुसार नाले सफाई , गटार सफाई , याबाबत अधिकारी वर्गाला त्वरित पाहणी करून समस्या दूर करण्याचे आदेश दिले आहेत , त्यांच्या अन्य मागण्या बाबत अंदाज पत्रकात तरतूद करण्यात आली असून अनेक कामे निविदा प्रोसिजर सुरू असून काही लवकरच धोरणात्मक असल्याने त्यावर लवकरच समस्या दूर केल्या जाईल अशी माहिती यावेळी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizens of kalyan faces problems before rain