पेटत्या डंपिंगच्या वासाने नागरिकांच्या नशिबी नरकयातनेची दिवाळी

पेटत्या डंपिंगच्या वासाने नागरिकांच्या नशिबी नरकयातनेची दिवाळी

उल्हासनगर : काही दिवसांपूर्वीच डंपिंगच्या वासामुळे होणाऱ्या त्रासाला स्थानिक नागरिकांनी पालिकेत येऊन टाहो फोडला, लोकशाही दिवशी चक्क तोंडावर मास्क लावून डंपिंगचा विरोध केला. तरीही पालिकेने ठोस उपाययोजना केल्या नसल्याने ऐन दिवाळीत पेटत्या डंपिंगच्या वासाने नागरिकांच्या नशिबी नरकयातना आल्या. त्यातून त्यांची सुटका होणार कधी?असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दिवाळी सुरू होऊन 6-8 दिवस झाले असून, त्यादिवसापासून कॅम्प नंबर 5 मध्ये खदाणीतील डंपिंग सातत्याने पेटते राहत आहे. कॅम्प नंबर 2 परिसरात म्हारळ गावाजवळील डंपिंग ओव्हरफ्लो झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून कॅम्प नंबर 5 येथील खदान भागात दुसरे डंपिंग ग्राऊंड तयार केले आहे. येथे वसाहती आणि दोन शाळाही असल्याने दररोज डंपिंगमधून येणाऱ्या महाभयंकर उग्र वासामुळे नागरिक विद्यार्थ्यांना श्वास घेणेही अवघड झाले आहे.  

या वासातून नागरिकांची सुटका व्हावी, म्हणून नगरनियोजन समिती सभापती मीना सोंडे,पर्यावरण तज्ञ गुणवंत पाटील यांनी डंपिंगच्या ढिगाऱ्यावर बायोकल्चरल आणि बायोसॅनिटायझर टाकण्याचा पर्याय हाताळला होता. त्याचा यशस्वी प्रयोगही झाला. मात्र, त्यानंतर या प्रयोगाची हवी तशी अंमलबजावणी केली जात नसल्याने किंबहुना पालिकेकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे पुन्हा वासाचे साम्राज्य पसरत असल्याचा आरोप मीना सोंडे यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com