शहरी नक्षलवाद्यांची काश्‍मीरशी लिंक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

मुंबई - शहरी नक्षलवादाची पाळेमुळे खणल्यानंतर ते काश्‍मिरी फुटीरवाद्यांच्याही संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचारात सहभागाच्या संशयावरून नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईनंतर पुणे पोलिसांच्या हाती काही महत्त्वपूर्ण ई-मेल व कागदपत्रे लागली आहेत. त्यातून ही स्फोटक माहिती उघड झाली आहे.

त्यातील एका पत्रामध्ये मार्च 2017 मध्ये झालेल्या बैठकीचा तपशील मांडण्यात आला आहे. या पत्रात म्हटले आहे, की 'काश्‍मिरातील फुटीरवाद्यांसोबत अंकित व गौतम संपर्कात आहेत. तेथे शत्रूंकडून (सरकारकडून) मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याच्या चित्रफीत सोशल मीडिया तसेच प्रसिद्धिमाध्यमांतून प्रसारित करायच्या आहेत. पॅलेट गनबाबत सर्वोच्च न्यायालयात चालू खटल्यासाठी कायदेशीर मदत उपलब्ध करायची आहे.''

"प्रो. साईबाबा याला शिक्षा झाल्यामुळे शहरी कॅडरमध्ये दहशत निर्माण झाली आहे. हा प्रभाव रोखण्यासाठी, काश्‍मीरमधील फुटीरवादी ज्याप्रमाणे स्थानिक दहशतवादी, त्यांच्या कुटुंबांना, दगडफेक करणाऱ्यांना पॅकेज देतात, त्याप्रमाणे आपणही शहरी, अंतर्गत कॉम्रेड्‌सच्या कामानुसार पॅकेज नक्की केले पाहिजे,' असे या पत्रात म्हटले आहे.

अर्थसाह्याची मागणी
जेएनयू व टीस्समध्ये रिसर्च फेलोंना अंतर्गत भागात पाठवायचे आहे. पंजाबमध्ये कॉ. साईबाबा व मारुती वर्करांना झालेल्या शिक्षेविरोधात आवाज उठवण्यात आला. त्यासाठी 50 हजारांचा खर्च आला. अशा बैठकी देशभरात बुद्धिजिवींमध्ये घ्यायच्या आहेत. त्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी पत्रात केली आहे.

Web Title: city naxalite kashmir link police