नवऱ्याच्या गाडीत पाहिलं 'ती'ला आणि बायकोने केली आख्खी मुंबई जॅम...

सुमित बागुल
Monday, 13 July 2020

सोशल मीडियावर या व्हिडीओ आगीसारखा पसरलाय आणि व्हायरल होतोय. 

मुंबई - मुंबईतील ट्रॅफिक आणि मुंबईच्या ट्रॅफिक जॅमबद्दल वेगळं काही सांगायला नको. मुंबईत पावसामुळे, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे, अपघातामुळे, नाकाबंदीमुळे, अनेक ठिकाणी बॉटल नेक असल्याने, अनेकदा दोन वाहनचालकांच्या भांडणामुळे ट्रॅफिक जॅम झाल्याचं आपण पाहिलंय, वाचलंय आणि अनेकांनी अनुभवलं देखील आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ मुंबईतील रस्त्यावर आणखी एका नव्या पद्धतीने कसा ट्रॅफिक जॅम होऊ शकतो हे सांगणारा आहे. हा व्हिडीओ शनिवारचा आहे. शनिवारी मुंबईतील पेडर रोडवर एक मोठा फॅमिली ड्रामा पाहायला मिळाला.       

हेही वाचा - अमिताभ यांना पाहण्यासाठी आलेल्या युपी मधील व्यावसायिकावरील हल्ला प्रकरणी जुहू पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

नक्की झालं काय ? 

एका दाम्पत्यामध्ये मोठं भांडण या व्हिडिओत पाहायला मिळतंय. यामध्ये एक तरुण काळ्या रंगाच्या गाडीतून जाताना पाहायला मिळतोय. या कारमध्ये हा तरुण आणि एक महिला देखील आहे. या काळ्या रंगाच्या गाडीमागून एक पांढऱ्या रंगाची गाडी येताना पाहायला मिळतेय. ही पांढऱ्या रंगाची गाडी एक महिला चालवताना पाहायला मिळते. क्षणात ही पांढरी गाडी काळ्या गाडीसमोर येते आणि काळ्या गाडीला अडवते आणि सुरु होतो मुंबईच्या रस्त्यावर फॅमिली ड्रामा.  मिळालेल्या माहितीनुसार काळ्या रंगाच्या कारमध्ये पांढऱ्या कारमध्ये असलेल्या महिलेचा पती होता. या महिलेने या माणसाला बाहेर येण्यास सांगितलं मात्र ही व्यक्ती ऐकत नाही हे पाहून ही महिला थेट कारच्या बॉनेटवर चढून स्वतःच्या चपलेने काचा बडवायला लागली. या सगळ्या फॅमिली ड्राम्याने पेडर रोडवर मात्र एका लेनमध्ये पूर्ण ट्रॅफिक जॅम झाला. 

हेही वाचा -  कोरोनाच्या लढाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

यावेळी उपस्थित वाहतूक पोलिसांनी या महिलेला विनवण्या केल्या मात्र रंगाच्या भरात ही महिला काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. अखेर नवरा कारमधून उतरल्यावर सर्वात आधी या महिलेने त्याला एक लाथ घातली. यानंतर दोघे या महिलेच्या कारमध्ये जाऊन बसलेत. तिथेही त्यांची बाचाबाची सुरु होती. महिलेचा राग अजिबात शांत होत नव्हता. ही महिला पुन्हा आपल्या गाडीतून उतरली आणि नवर्याच्या गाडीत बसलेल्या महिलेशी हुज्जत घालताना पाहायला मिळाली.

सोशल मीडियावर या व्हिडीओ आगीसारखा पसरलाय आणि व्हायरल होतोय. 

city witness major family drama women climbs on husbands car during argument peddar rode jammed


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: city witness major family drama women climbs on husbands car during argument peddar rode jammed