पाळीव प्राण्यांसाठी दिल्लीहून मुंबईला स्पेशल जेट, तिकिटाची किंमत एकाल तर थक्क व्हाल

पाळीव प्राण्यांसाठी दिल्लीहून मुंबईला स्पेशल जेट, तिकिटाची किंमत एकाल तर थक्क व्हाल

मुंबई- सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. मात्र काही प्रमाणात निर्बंध शिथिल केल्यानं विमानानं प्रवास करणं शक्य आहे. याचदरम्यान ‘all-pet’ खासगी विमान लवकरच दिल्लीत अडकलेल्या पाळीव प्राण्यांना आपल्या पालकांसह पुन्हा मुंबईत आणणार आहे. सर्व प्रकारच्या वाहतुकीवर निर्बंध आणल्यामुळे देशभरातले असंख्य लोक अडकून पडले. यादरम्यान अनेक पाळीव प्राणीही अडकले. आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या मालकांना त्यांच्या गावी जावे लागले म्हणून पाळीव प्राणी तिथेच अडकून बसले.

उद्योजक आणि सायबर सुरक्षा संशोधक दीपिका सिंह यांच्यामुळे पाळीव प्राणी आणि त्यांच्या मालकांची पुन्हा भेट होण्याची शक्यता आहे. आता अडकलेल्या पाळीव प्राण्यांसाठी त्यांच्या मालकांनी एक जेट बुक केले आहे. हे जेट दोन Shih Tzus, एक  Golden Retriever  आणि एक Lady Pheasant bird यासाठी बुक करण्यात आलं आहे. दरम्यान विमानातील प्रवास पूर्ण करण्यासाठी कमीतकमी दोन आणखी पाळीव प्राण्यांची आवश्यकता आहे. 

प्रत्येक सीटसाठी 1.6 लाख रुपये किंमत आधीपासून थोड्या प्रमाणात उभे आहेत आणि जर आम्हाला सहा प्रवासी न मिळाल्यास त्याच्यात आणखी भाडेवाढ होईल, असं सिंग यांनी म्हटलं. 

सिंग यांनी सर्व पाळीव उड्डाणांसाठी चार प्रवासी सापडले आहे. मात्र सर्व सहा जागा आरक्षित झाल्यावरच ते विमान सुटू शकणार आहे. तर आम्ही आणखी दोन पाळीव प्राण्यांची वाट पाहत आहोत. हे जेट सहा सीटर मानवी प्रवाशांसाठी आहे आणि यापैकी बहुतेक जेटची क्षमता प्रत्येक प्रवाशानुसार अंदाजे 75 किलो एवढी असते. यात 450 किलो किंवा त्याहून अधिक क्षमता जोडली जाऊ शकते. मात्र या जेटमध्ये आता ही लहान पाळीव प्राणी आहेत. त्यामुळे यात बरेच लोक बसू शकतात, असं सिंग म्हणाल्यात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com