बॅंक ऑफ बडोदावर तीन कोटींचा दावा

बॅंक ऑफ बडोदावर तीन कोटींचा दावा


नवी मुंबई : भुयार खोदून तब्बल चार कोटींचा दरोडा टाकल्याप्रकरणी बॅंक ऑफ बडोदाच्या पीडित खातेदारांनी आता ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे. दरोडा प्रकरणाला दोन वर्षे उलटल्यानंतरही चोरीस गेलेला मुद्देमाल न सापडल्यामुळे तसेच नुकसान झाल्यामुळे १४ जणांनी बॅंकेविरोधात ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या नुकसानभरपाईचा दावा केला आहे. कोकण भवन येथील ग्राहक मंच व राज्य ग्राहक न्यायालय अशा दोन ठिकाणी वेगवेगळ्या १४ ग्राहकांनी हा दावा केला आहे. 

दोन वर्षांपूर्वी सानपाड्यातील बॅंक ऑफ बडोदाच्या शाखेवर दरोडा टाकून चोरट्यांनी बॅंकेच्या लॉकर रूममधून ३० लॉकर फोडून चोरी केली होती. या चोरीत लॉकर रूममध्ये ठेवलेले दागिने, सोने-चांदीची नाणी, हिरे, परदेशी चलन आदी सुमारे ४ कोटींचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास केल्यावर बॅंकेने आरबीआय बॅंकेने घालून दिलेल्या नियम व अटींचा भंग केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तसे आरबीआयला लेखीसुद्धा कळवले आहे. चोरट्यांच्या टोळीला अटक केल्यावर पोलिसांना सापडलेला काही मुद्देमाल अद्याप ग्राहकांना परत केलेला नाही. त्यामुळे ग्राहकांनी या प्रकरणाची सुनावणी सुरू असलेल्या मोक्का न्यायालयात मुद्देमाल परताव्यासाठी अर्ज केला आहे. त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. तसेच लॉकर रूमच्या अटींबाबत ग्राहकांनी माहिती अधिकारात बॅंकेतून माहिती मागितली असता बॅंकेने आरबीआयच्या सर्व नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाल्याची माहिती वकील स्वप्नील कदम 
यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com