Video : विनयभंगाच्या आरोपात मुंबईच्या महापौरांना 'त्या' मुलीकडूनच क्लीन चिट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

मुंबई : “महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात पिरगळला नाही. त्यांनी माझा विनयभंग केलेलाच नाही. काही राजकीय पक्ष चुकीचा प्रचार करत आहेत,” अशा शब्दात सांताक्रूज आंदोलनातील ‘त्या’ महिलेने आपली भूमिका मांडली आहे. ‘महाडेश्वर यांनी एका महिलेचा विनयभंग केला, त्यांनी महिलेचा हात मुरगळला’ असा संदेश प्रसारित करणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. "हा व्हिडीओ वायरल करण्यामागे काही राजकीय कार्यकर्ते असून त्यामागे विश्वनाथ महाडेश्वर सरांची बदनामी करणं हा हेतू आहे”, असंही मत या महिलेनं व्यक्त केलं आहे. 

गेल्या आठवड्यात सांताक्रूज पटेलनगर येथे विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी रास्ता रोको केला होता. त्यावेळी “आम्ही हातांची साखळी करून महापौरांना रस्त्यात रोखले असता महाडेश्वर सरांनी फक्त माझा हात बाजूला केला, त्यांनी माझा हात पिरगळला नाही” असं ‘त्या’ महिलेने एका व्हिडिओद्वारे सांगितलं आहे.

“या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे माझी आणि महाडेश्वर सरांची विनाकारण बदनामी होत आहे. प्रत्यक्षात माझा विनयभंग झालेलाच नाही. मी महाडेश्वर सरांच्या विरोधात पोलिसांकडे विनयभंगाची तक्रार दाखल करावी, यासाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी माझ्यावर दबाव आणत आहेत. पण मला राजकारणात रस नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही”, असंही ‘या’ महिलेने व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: clean cheat to mayor of Mumbai Vishwanath Mahadeshwar for misbehaving with girl