'स्वच्छ रेल, स्वच्छ भारत' मोहीम कल्याणमध्ये सुरू 

Clean Rail Clean India campaign continues in Kalyan
Clean Rail Clean India campaign continues in Kalyan

कल्याण : देशातील सर्वांत अस्वच्छ रेल्वेस्थानकांच्या यादीत नाव आल्यामुळे टीकेच्या केंद्रस्थानी सापडलेल्या कल्याण रेल्वेस्थानकातील कर्मचारी-अधिकाऱ्यांनी आता स्वच्छता मोहिमेसाठी कंबर कसली आहे.

महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त रेल्वेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबर या कालावधीत "स्वच्छता हीच सेवा पंधरवडा' साजरा केला जात आहे. या अंतर्गत शनिवारी कल्याण स्थानकात "स्वच्छ रेल, स्वच्छ भारत' मोहिमेला सुरुवात झाली. या वेळी कल्याण स्थानकातील स्टेशनमास्तर प्रदीपकुमार दास, स्टेशन डायरेक्‍टर यशवंत व्हटकर यांच्यासह विविध विभागांमधील 61 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन स्वच्छतेची शपथ घेतली. स्थानकात दोन सत्रांत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

देशातील स्वच्छ रेल्वेस्थानकांच्या यादीत सुरुवातीच्या 20 क्रमांकांमध्ये कल्याण स्थानकाचे नाव यावे, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. याच दृष्टिकोनातून पुढील पंधरवड्यात स्वच्छतेसंबंधी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या उपक्रमांमध्ये प्रवासी तसेच प्रवासी संघटनांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन कल्याण रेल्वे स्टेशन मास्तर प्रदीपकुमार दास यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com