मुंबईतील नद्यानाले स्वच्छ, सुंदर करा - कदम 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 जून 2018

मुंबई - मुंबईतील नद्यानाले पुढील सहा महिन्यांत सुंदर आणि स्वच्छ करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी अधिकाऱ्यांना दिले. मुंबईतील नदीप्रदूषण आणि राज्यातील प्रदूषित नदीपट्टे या संदर्भात आढावा बैठक मंत्रलयात झाली. या वेळी अपर मुख्य सचिव सतीश गवई उपस्थित होते. 

या वेळी कदम म्हणाले, की मिठी, दहिसर, बोईसर या मुंबईतील नद्या स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त होण्यासाठी सहा महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा. नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करणे, गाळ, कचरा काढणे, सांडपाणी बंद करणे, कारखान्याचे रासायनिक पाणी सोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, नदीकाठाने झाडे लावणे, नदी परिसरात नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी सुविधा निर्माण कराव्यात, बसण्यासाठी खुर्च्याची सोय करावी. परिणामी, नदी परिसराला पर्यटन स्थळांचे स्वरूप येईल. 

Web Title: Clean the rivers in Mumbai says ramdas kadam