esakal | क्लीनअप मार्शल महिले मारहाण! बाईक स्वाराला अटक!
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

क्लीनअप मार्शल महिले मारहाण! बाईक स्वाराला अटक!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चेंबूर : क्लीनअप मार्शल महिला उमरसी बाप्पा चौक सिग्नल जवळ मास्क न घातलेल्या व्यक्तीवर कारवाई करीत असताना अचानक एक बाईक स्वार येऊन तिला मारहाण केली त्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना आज दुपारी दोन च्या सुमारास घडली आहे.

श्रद्धा कर्डक वय - 20 असे या जखमी महिलेचे नांव आहे. क्लीनअप मार्शल कामगारांना मारहाण करण्याच्या घटना घडत असताना आज दुपारी ठीक.2 वाजण्याच्या सुमारास चेंबूर येथील उमरसी बाप्पा चौक सिग्नल जवळ श्रद्धा कर्डक व वर्षा काळे या दोघी आपले काम बजावीत असताना एक बाईक स्वार चेंबूर नाकाच्या दिशेने जात असताना तो हॉर्न वाजवू लागला.

हेही वाचा: गौरी गणपतीच्या सजावटीतून ऑनलाइन शिक्षणाचा संदेश

श्रद्धा यांनी त्याला हॉर्न वाजवू नको तू एका बाजूने जा असे सांगितले. तो तुम्ही अशी कारवाई करून भाड खाता असे म्हणून अश्लील शिव्या देऊ लागला. या ठिकाणाहून निघून जा! तुला मारेन अशी धमकी दिली त्यामुळे जखमी महिलेने त्याला उलट उत्तर दिले.

आरोपी बाईक वरून उतरून तिच्या डोक्यात हेल्मेट घालत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिच्या डोक्याला मोठी जखम झालेली आहे. तसेच मुक्का मार ही लागला आहे. तिच्या सोबत असलेल्या महिलेने तिला उपचार करिता तिला शताब्दी रुग्णालयात घेऊन गेले. तिच्या कपाळाला सात टाके लागले आहेत. आरोपी मोहसीन वासिम शेख याला जमावाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जखमी महिलेने चुनाभट्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चुनाभट्टी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

loading image
go to top