किल्ले गुमतारा संवर्धन मोहीम!

दीपक हिरे
शनिवार, 1 डिसेंबर 2018

शिवकालीन इतिहास सांगणारा किल्ले गुमतारा हा भिवंडी तालुक्यातील एकमेव गड असून तो दुर्लक्षीत राहिल्याने पुरातत्व खाते व प्रशासनावर शिवभक्त नाराज आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दुगाड गावातील शिवभक्त गेल्या पाच वर्षापासून वृक्षारोपण करत आहेत.

वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील दुर्लक्षित राहीलेला एकमेव किल्ला गुमतारा या किल्ल्याची संवर्धनाची मोहीम येत्या रविवारी मराठा स्वराज भिवंडी विभाग व शिवस्मरण प्रतिष्ठान, अंबाडी विभाग संयुक्तरित्या राबविणार आहेत.

येथील गुमतारा किल्ल्याची ऊंची सुमारे 1949 फुट असून वज्रेश्वरीला लागून असलेला एक उत्तुंग डोंगर म्हणजेच किल्ले गुमतारा होय. शिवकालीन इतिहास सांगणारा भिवंडी तालुक्यातील एकमेव किल्ला असताना दुर्लक्षित राहिल्यामुळे शिवभक्तांमध्ये नाराजी आहे. गुमतारा किल्ल्याचा माथ्यावर पोहचन्यास तीन तास लागतात. ह्या किल्ल्याच्या माथ्यावरून तुंगारेश्वर जंगल, कामनदुर्ग, भिवंडी प्रांत हा परिसर दिसतो, त्या काळी ह्या परिसरावर देखरेख ठेवता यावी म्हणून ह्या गडाची निर्मिती झाली. या परिसरात घनदाट जंगलअसून दोन किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध वज्रेश्वरी देवी मातेच मंदिर आहे, पायथ्याशी घोटगाव व दुगाड अशी गाव आहेत. 

ऐतिहासिक संदर्भातील नोंदणी प्रमाणे 24 मार्च 1737 साली मराठ्यांची एक टोली माहुली किल्ल्याच्या रानातून निघाली व ह्या गुमतारा  किल्याच्या रानात विसावली.  

किल्ल्यावर निरनिराळ्या प्रकारचा औषधी वनस्पती आहेत तसेच पाण्याचा व्यवस्थेसाठी 7 टाके असून ते 5ते 6फूट खोल आहेत परंतु सतत दुर्लक्षीत राहिल्यामुळे त्या पूर्ण मातीने भरल्यामुळे गडावर पाण्याची सोय होत नाही. किल्ल्याची तटबंदी ही कातली दगड़ात कोरीव काम करून उभी केली होती. दुर्दैव अस आहे की तटबंदी आणि बुरुजाचे दगड खाली जंगलात अस्थव्यस्थ पडलेले आहेत.

शिवकालीन इतिहास सांगणारा किल्ले गुमतारा हा भिवंडी तालुक्यातील एकमेव गड असून तो दुर्लक्षीत राहिल्याने पुरातत्व खाते व प्रशासनावर शिवभक्त नाराज आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दुगाड गावातील शिवभक्त गेल्या पाच वर्षापासून वृक्षारोपण करत आहेत.

आतापर्यत सतत दुर्लक्षीत राहिलेल्या किल्ले गुमतारा च संवर्धन व्हाव म्हणून गेल्या पाच वर्षापासून गड संर्वधनावर काम करणाऱ्या *मराठा स्वराज भिवंडी विभाग व शिवस्मरण प्रतिष्ठान अंबाड़ी विभाग तसेच स्थानिक शिवभक्त एकत्र येऊन किल्ले गुमतारा च संवर्धन करणार असल्याचे शिवस्मरण प्रतिष्ठान चे अध्यक्ष हेमंत पाटील ह्यांनी सांगितले.

Web Title: cleaning on Gumtara fort