महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त 'स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा' 

gandi jayati padyatra
gandi jayati padyatra

कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा भाजपाच्या वतीने कल्याण पूर्वमध्ये महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आज (रविवार ता. 21 ऑक्टोबरला) सकाळी महात्मा गांधी स्वच्छता सेवा पदयात्रा काढून नागरीकांशी संवाद साधत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पूर्वमधील श्रीराम टॉकीज येथून सुरुवात झाली, खडगोलवली मार्गे हनुमान नगर व्हाया काटेमानवली नाका परिसरात समारोप झाला. यावेळी स्वच्छता मोहीम ही राबविण्यात आली तर हा कार्यक्रम महिना भर सुरू राहणार आहे. आज स्वच्छता मोहीम सोबत नागरिकांशी संवाद साधत त्यांना स्वच्छतेचे महत्व ही पटवून देत त्यांच्या समस्या ही जाणून घेतल्या. 

या पदयात्रेत आमदार गणपत गायकवाड, परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के, संजय मोरे, नाना सूर्यवंशी, नगरसेवक मनोज राय, गणेश भाने, हेमलता पावशे आणि पदाधिकारी अंनता पावशे, पांडुरंग भोसले, संदीप सिह, संतोष पाटिल, अरुण दिघे, नितेश म्हात्रे, राजू अंकुश, महिला अध्यक्ष सुमित्रा नायडू, वंदना मोरे, सुनीता पांढरपट्टे, यांच्या समवेत मोठ्या प्रमाणात महिला आणि युवकांनी या पदयात्रेत सहभाग घेतला होता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com