सुभाष घईंविरोधातील तपास बंद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

मुंबई - फिल्ममेकर सुभाष घई यांच्या विरोधात अभिनेत्री केट शर्मा हिने केलेल्या तक्रारीचा तपास वर्सोवा पोलिसांनी बंद केला आहे. त्यामुळे मी टूच्या आरोपातून घई यांची सुटका होण्याची शक्‍यता आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात सुरू असलेल्या मी टू मोहिमेत महिनाभरापूर्वी केट शर्मा हिने सुभाष घई यांचे नाव घेतले होते. तशी तक्रार तिने वर्सोवा पोलिस ठाण्यात केली होती. या तक्रारीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी केट शर्माला जबाब नोंदविण्यासाठी बोलावले होते. मात्र, केट शर्मा पोलिस ठाण्यात गेली नाही, त्यामुळे पोलिसांनी हा तपास थांबवला आहे. 

Web Title: Close the investigation against Subhash Ghai