अनधिकृत शाळा बंद करा ; सीईओ भीमनवार यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

ठाणे : जिल्ह्यातील अनधिकृत शाळा बंद करून त्याबाबतचे हमीपत्र संस्थाचालकांनी शिक्षण विभागास सादर करा; अन्यथा दंडात्मक कारवाईस सामोरे जा, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी दिले. पालकांनी आपल्या पाल्यांचा या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास सर्वस्वी जबाबदारी त्यांची असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ठाणे जिल्ह्यातील 21 माध्यमिक शाळा अनधिकृत असल्याची माहिती जिल्हा परिषदेने दिली. यात मराठी व हिंदी माध्यमाच्या प्रत्येकी चार आणि इंग्रजी माध्यमाच्या 13 शाळांचा समावेश आहे. शाळांकडे नाहरकत प्रमाणपत्र नसल्याने त्यांना अनधिकृत ठरविण्यात आले. संबंधित संस्थाचालकांनी त्यांच्या अनधिकृत शाळा ताबडतोब बंद करून त्याबाबतचे हमीपत्र शिक्षण विभागास सादर करावे. या शाळा बंद न केल्यास संस्थाचालकांविरोधात शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे भीमनवार यांनी सांगितले. 

मराठी माध्यम - आदर्श विद्यालय, कल्याण, प्रशिक स्पेशल विद्यालय, मिरा-भाईंदर, स्वामी समर्थ हायस्कूल, अंबरनाथ, प्रगती विद्यामंदिर, अंबरनाथ. 

हिंदी माध्यम - आदर्श विद्यालय, कल्याण; नालंदा विद्यालय, ठाणे; आदर्श माध्यमिक विद्यालय, ठाणे; अरुणज्योत विद्यालय, ठाणे. 

इंग्रजी माध्यम - आदर्श विद्यालय, कल्याण; पोद्दार इंटरनॅशनल विद्यालय, उंबर्डे; भारतीय जागरण इंग्रजी माध्यमिक विद्यालय, नवी मुंबई; श्री साईज्योती माध्यमिक विद्यालय, नवी मुंबई; अल मुमिनाह सेकंडरी स्कूल, नवी मुंबई; विद्या उत्कर्ष मंडळ इंग्रजी विद्यालय, नवी मुंबई; ज्ञानदीप सेवा मंडळ इंग्रजी माध्यमिक विद्यालय, नवी मुंबई; आरक्वॉम इस्लामिक विद्यालय, ठाणे; रफिक इंग्रजी विद्यालय, ठाणे; स्टार इंग्रजी विद्यालय, ठाणे; होली मारिया कॉन्व्हेंट इंग्रजी विद्यालय, ठाणे; नवभारत इंग्रजी विद्यालय, अंबरनाथ; आतमन ऍकडमी, ठाणे. 

Web Title: Close Unauthorised School says Thane ZP CEO Bhimanvar