डहाणू, वाणगाव, गंजाड, सायवन येथे कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

डहाणू : अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा सुप्रीम कोर्टाने शिथील केल्यामुळे त्यावर पुनर्विचार करण्यासाठी देशभर भारत बंदच्या नार्याला प्रतिसाद देत पालघर जिल्हयात आदिवासी एकता परिषद, भुमिसेना, पालघर, सफाळे,मस्तान नाका, वाणगाव, नागझरी, डहाणू येथे कडकडीत बंद पाळण्यात आल‍ा.

वाणगाव येथे आदिवासी एकता परिषदेचे भरत वायडा, दशरथ बामनिया, आशिष दुबळा, निलेश वाढाण, रघुनाथ सुतार, रमेश आहडी, कमलेश कोम, विलास सुमडा यांनी बंदचे आवाहन केले. वाणगाव कासा वाहतुक बंद ठेवण्यात आली. बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. भुमिसेना अध्यक्ष काका धोदडे यांनी केलेल्या अवाहनाला ठिकठिकाणी प्रतिसाद पाहायला मिळत होता.

डहाणू तालुक्यात डहाणू बाजारपेठ, ईराणी रोड, सागरनाका, मसोली, मुख्य बाजारपेठ येथे कडकडित बंद पाळला. तर गंजाड येथे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. डहाणूच्या दुर्गम भागात सायवन येथे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे बंदचा ठिकठिकाणी परिणाम दिसुन आला. तर मस्तान नाका येथेही हायवेवरिल हाॅटेल बंद ठेवण्यात आली. मात्र बंदमुळे कुठेहr अनुचित प्रकार किंवा घटना घडली नाही.

Web Title: closed in dahanu vangao ganjad saiwan