जिल्हा रुग्णालयात स्वच्छतागृह बंद

 जिल्हा रुग्णालयात बंद असलेले स्‍वच्‍छतागृह.
जिल्हा रुग्णालयात बंद असलेले स्‍वच्‍छतागृह.

मुंबई : जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांसाठी महिला व पुरुषांना स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृह, चेंजिंग रूम बांधण्‍यात आले आहे. मार्च २०१८ मध्‍ये येथे कामही पूर्ण करण्‍यात आले. एक वर्ष चार महिने होऊनही अजून स्वच्छतागृह खुले करण्‍यात आले नाही. स्वच्छतागृह उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असतानाही जिल्हा रुग्ण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्‍ये संतापाचे वातावरण आहे. 

अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात हजारोच्या संख्येने रुग्ण येतात. रुग्णांसोबत येणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांना सुविधा मिळावी यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व चेंजिंग रूम असावे, असा निर्णय रुग्ण प्रशासनाने घेतला.

जिल्हा वार्षिक नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत रुग्णालयाच्या इमारतीच्या बाजूलाच स्वच्छतागृह बांधण्यास मंजुरी मिळाली. १४ लाख १५ हजार रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर झाला. स्वच्छतागृह मार्च २०१८ मध्ये बांधून पूर्ण झाले. स्वच्छतागृहाचे उद्‌घाटन कधी होणार, याला मुहूर्त कधी मिळणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात बांधण्यात आलेले स्वच्छतागृह कायमस्वरूपी स्वच्छ राहावे यासाठी पे अँड यूज या तत्त्वावर देण्याचा प्रयत्न आहे. याला मान्यता मिळावी यासाठी आरोग्य विभागाचे उपसंचालक कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
- डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com