कपडा व्यापाऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

मुंबई - मालाड रेल्वे स्थानकात मंगळवारी पीयूष छेडा (वय 51) या कपडा व्यापाऱ्याने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. या प्रकाराचे सीसीटीव्हीत चित्रण झाले आहे. या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिस तपास करत आहेत.

आर्थिक कारणात्सव त्यांनी व्यवसाय बंद करून काही महिने खासगी ठिकाणी नोकरी केली होती. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी पुन्हा कपड्याचा व्यवसाय सुरू केला होता. आत्महत्येच्या दोन दिवस आधी पीयूष यांनी कपड्याच्या कारखान्यासाठी मशिन खरेदी करून त्याचे पैसेही संबंधितांना दिले होते. तयार कपड्यांकरता नवीन मशिन पाहण्यासाठी जात असल्याचे सांगून ते मंगळवारी घराबाहेर पडले. ते सकाळी मालाड स्थानकाच्या फलाट क्रमांक 3 वर आले. बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलसमोर उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: cloth businessman suicide