भिवंडीत कापड गोदामास आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

भिवंडी - भिवंडी तालुक्‍यातील रहानाळ ग्रामपंचायत परिसरातील मनीसुरत-स्वागत कम्पाऊंडमध्ये श्रीहर्ष ट्रान्स्पोर्टच्या कापडाच्या गोदामास रविवारी पहाटे अचानक भीषण आग लागली. यात लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.

भिवंडी - भिवंडी तालुक्‍यातील रहानाळ ग्रामपंचायत परिसरातील मनीसुरत-स्वागत कम्पाऊंडमध्ये श्रीहर्ष ट्रान्स्पोर्टच्या कापडाच्या गोदामास रविवारी पहाटे अचानक भीषण आग लागली. यात लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.

भिवंडी-ठाणे महामार्गावरील अंजूरफाटा येथील श्रीहर्ष करिअर ट्रान्स्पोर्टच्या गोदामात पक्‍क्‍या कापडाचा माल साठवलेला होता. आज पहाटे दोनच्या सुमारास गोदामांत साठवलेल्या कापडाच्या गठाण, तागे आणि पॅकिंग केलेल्या रोलला आग लागली. स्थानिकांनी पोलिस आणि अग्निशमन दलास याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले. हे पाहून पोलिसांनी ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. त्यांनी पाण्याचा जोरदार मारा केल्यामुळे सकाळी सातपर्यंत आग नियंत्रणात आली. आग लागलेल्या ट्रान्स्पोर्टच्या दुमजली इमारतीत तळमजल्यावर असलेल्या मोठ्या गोदामास सहा दरवाजे असून त्याचे शटर उचकटून अग्निशमन दलाने रासायनिक द्रव्यमिश्रित पाण्याचा मारा केला, तरीदेखील आग नियंत्रणात येत नसल्याने त्यांनी गोदामाच्या भिंतीला ठिकठिकाणी छिद्रे पाडून चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत सहा तासांत आग नियंत्रणात आणली. आगीचे कारण समजू शकले नाही. नारपोली पोलिसांनी याबाबत नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे. 

Web Title: cloth godown fire in bhiwandi