
मुंबईतील एका क्लाउड किचनचा अनुभव सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका इंस्टाग्राम युजरने (@octanexoxygen) पनीर डिश ऑर्डर केली, पण त्याऐवजी चिकन मिळालं. या अनुभवानंतर त्यांनी या किचनची लोकेशन पाहण्यासाठी थेट त्या ठिकाणी भेट दिली आणि धक्कादायक वास्तव समोर आलं.